मुलांच्या बौद्धिक क्षमतांचा सकारात्मक दृष्टीकोणातून विचार होणे गरजेचे

मुलांच्या बौद्धिक क्षमतांचा सकारात्मक दृष्टीकोणातून विचार होणे गरजेचे

*कोकण Express*

*मुलांच्या बौद्धिक क्षमतांचा सकारात्मक दृष्टीकोणातून विचार होणे गरजेचे*

*कासार्डे ः संजय भोसले*

जि. प. प्राथमिक शाळा तळेरे नं. १ येथे ‘विद्यार्थी बौद्धिक क्षमता वाढ’ या विषयावरील मार्गदर्शनात सदाशाव पांचाळ यानी वरील मत व्यक्त केले
आजच्या काळातील मुलं ही मूलतःच हुशार आहेत. या मुलांच्या हुशारीचा सकारात्मक दृष्टिकोनातून वापर करून त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास होणे आवश्यक आहे. याच हेतूने शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. शशांक तळेकर, श्री. दिलीप तळेकर व विद्यमान अध्यक्ष श्री. राजेश जाधव यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत *विद्यार्थी बौद्धिक क्षमता वाढ* या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता केले होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सदाशिव पांचाळ यांनी “कोणताही गणिती पाढा एका मिनिटात कसा तयार करावा?” व “आपल्या स्मरणशक्तीचा विकास कसा करावा?” या दोन महत्वाच्या मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यास मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या बौद्धिक क्षमता विकसित होणे अत्यावश्यक आहे. यासाठी विविध प्रकारचे महत्वपूर्ण व प्रोत्साहनपर अनेक कार्यक्रम यापुढील काळात शाळेमध्ये आयोजित केले जातील. त्याचा लाभ निश्चितच सर्व पालक व विद्यार्थ्यांना होईल. असे प्रतिपादन राजेश जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.

सदाशिव पांचाळ यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना भावी काळात स्पर्धा परीक्षेतील यशासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. अशा प्रतिक्रिया शिक्षकवर्गाने व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षक श्री. विभूते सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम. बेळणेकर मॅडम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!