*कोकण Express*
*खा. शरद पवार यांच्या वाढदिनी गरजू महिलांना वस्तूवाटप*
*सिंधुदुर्ग*
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून गरजू महिलांना गृह उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. हे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभा मतदार संघ अध्यक्ष डॉक्टर अभिनंदन मालणकर, किसान कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, जिल्हा सरचिटणीस सुधाकर करले, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष सुधाकर ढेकणे, बंड्या ढेकणे, नयन गावडे, अविनाश चव्हाण, रवींद्र गावडे, गणेश गावडे, महेंद्र जाधव, निलेश जाधव, सतीश जाधव, सागर वारंग, देवेंद्र जाधव, प्रसाद गावडे, सुनील गावडे, विनायक गावडे, गंगाराम चौगुले, सुभाष चौगुले आदी उपस्थित होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या उपक्रमाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व नयन गावडे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

