भाजप युवानेते विशाल परब यांनी घेतली कर्नाटकाच्या ग्रामविकास मंत्र्यांची भेट

भाजप युवानेते विशाल परब यांनी घेतली कर्नाटकाच्या ग्रामविकास मंत्र्यांची भेट

*कोकण  Express*

*▪️भाजप युवानेते विशाल परब यांनी घेतली कर्नाटकाच्या ग्रामविकास मंत्र्यांची भेट*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री जे. एस. विश्वर आप्पाजी यांची भाजपचे युवानेते विशाल परब यांनी बेंगलोर येथे भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक आणि विकासाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे बेळगावमधील आमदार संजय पाटील उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा आणि बेळगाव यांचे आर्थिकदृष्ट्या एकप्रकारे एक नातं आहे. कर्नाटक राज्यातील बेळगावहून मोठ्या प्रमाणात भाजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होते. यावेळी जिल्ह्यातील विविध विषयांवर या भेट चर्चा करण्यात आली. विशाल परब यांनी कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री जे. एस. विश्वर आप्पाजी यांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याचे आमंत्रण विशाल परब यांनी एस. विश्वर आप्पाजी यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!