निकृष्ट कामामुळे राष्ट्रीय महामार्गाचे बंद पाडले काम

निकृष्ट कामामुळे राष्ट्रीय महामार्गाचे बंद पाडले काम

*कोकण  Express*

*▪️निकृष्ट कामामुळे राष्ट्रीय महामार्गाचे बंद पाडले काम…*

*▪️वैभववाडी भाजपा बंड्या मांजरेकर*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

वैभववाडी-गगनबावडा मार्गावरील खड्डे मातीने भरण्यास सुरुवात केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वैभववाडी भाजपा पदाधिकारी यांनी करुळ येथे जावून निकृष्ट काम बंद पाडले आहे. निकृष्ट काम खपवून घेणार नाही. चुकीच्या पद्धतीने काम रेटणा-या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपा पदाधिकारी बंड्या मांजरेकर यांनी केली आहे.
करुळ मधील खड्डे भरण्यासाठी मातीचे मोठे ढिग उतरविण्यात आले आहेत. चार दिवसापुर्वी भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग चे उपकार्यकारी अभियंता नरनवार यांनी तात्काळ खड्डे डांबराने भरतो असे सांगितले होते. मात्र खड्डे मातीने भरण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे भाजपा पदाधिकारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. मातीने खड्डे भरण्याचे सुरू असलेले काम भाजपा पदाधिकारी यांनी बंद पाडले. यावेळी भाजपा पदाधिकारी बंड्या मांजरेकर, माजी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, वैभववाडी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, माजी नगरसेवक संजय सावंत, उदय पांचाळ व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!