कणकवली तालुक्यातील कासरल गावातील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश

कणकवली तालुक्यातील कासरल गावातील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश

*कोकण Express*

*▪️कणकवली तालुक्यातील कासरल गावातील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश*

*▪️मनसेच्या शाखेची स्थापना*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कणकवली तालुक्यातील कासरल गावातील तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. माजी आमदार मनसे सरचिटणीस जीजी उपरकर यांच्या हस्ते तरुणांनी मनसेचा झेंडा हातात घेतला.

♦️यावेळी उपविभाग प्रमुख पदी रणजित सावंत, राजेश सावंत, लक्ष्मण बागवे, समीर सावंत, सिद्धेश सावंत, सागर सावंत, सुनील परब, संदीप सावंत, संजय सावंत, दीपक सावंत, राजू सावंत, सूर्यकांत सावंत या तरुणांनी प्रवेश केला. तरुणांना शुभेच्छा देताना आज राज्यात मनसे जनतेसाठी रस्त्यावर उतरते जनहिताची, समाजसेवेची कामे मनसेच्या माध्यमातून होताना दिसत असुन राजसाहेबांना मानणार्‍या मनसेवर प्रेम करणार्‍या तरुणाईने मनसेच्या या कामात पुढे होऊन सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी जीजी उपरकर यांनी केले. याप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुका अध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, तालुका सचिव संतोष कुडाळकर, उपतालुका अध्यक्ष अनंत आचरेकर,शांताराम सादये, दत्ताराम अमृते, गणेश कसवणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!