वैभववाडीचे सुपुत्र अजित रावराणे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान; पुरस्कारप्राप्त श्री. रावराणे यांचे सर्वत्र होतेय अभिनंदन

वैभववाडीचे सुपुत्र अजित रावराणे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान; पुरस्कारप्राप्त श्री. रावराणे यांचे सर्वत्र होतेय अभिनंदन

*कोकण Express*

*वैभववाडीचे सुपुत्र अजित रावराणे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान; पुरस्कारप्राप्त श्री. रावराणे यांचे सर्वत्र होतेय अभिनंदन…*

*वैभववाडी  ः प्रतिनिधी*

सामाजिक, आरोग्य व क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अजित रावराणे यांना दैनिक मुंबई हलचल चे संपादक दिलशान खान यांच्या संस्थेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचा वितरण सोहळा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या उपस्थितीत पार पडला. पुरस्कारप्राप्त श्री. रावराणे यांचा राज्यपाल यांनी प्रमाणपत्र व चषक देऊन सत्कार केला. अजित रावराणे यांचे वैभववाडी तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

अजित रावराणे हे वैभववाडी तालुक्यातील लोरे गावचे सुपुत्र आहेत. गेले अनेक वर्ष ते मुंबई येथे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. नवक्षितिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात दिला आहे. तसेच विभागातील राहिवाश्यांकरता मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर,औषध वाटप आदी उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोवीड योद्यांचा त्यानी सन्मान केला आहे. तरुण मित्र मैत्रिणीकरता क्रिकेट सामने, कबड्डी सामन्यांचे आयोजन त्यांनी करत खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रत्नांना त्यांनी राज्याच्या मंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिवजयंती महोत्सव, नवरात्र उत्सव, दहीहंडी या सारखे पारंपरिक उत्सव साजरे करून त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले आहे.

दैनिक मुंबई हलचलचे संपादक दिलशान खान यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार, मंत्री नगरसेवक व नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!