एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २१ नोव्हेंबरला खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी बंद पाळावा

एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २१ नोव्हेंबरला खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी बंद पाळावा

*कोकण Express*

*▪️एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २१ नोव्हेंबरला खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी बंद पाळावा*

*▪️रिक्षा चालक-मालक संघटनेचे आवाहन*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत विलीनीकरणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला रिक्षा चालक मालक संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. यात कणकवली शहरातील रिक्षा चालक-मालक यांच्या सोबत खाजगी प्रवासी वाहन, सहा सीटर, मॅजिक यांनी ही सहभागी होत पाठिंब्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी बंद पाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फारच कमी पगार आहे. त्यामुळे शासन सेवेत विलीनीकरणासाठीची कर्मचाऱ्यांची मागणी रास्त आहे. या मागणीला पाठिंबा देण्याच्या अनुषंगाने २१ रोजी हा बंद पाळावा असे आवाहन रिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने अण्णा कोदे, संतोष नाईक व बाळा वराडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!