मोदी सरकारने केलेले कृषी कायदे सरकारला मागे घ्यावे लागणे हा बळीराजाच्या आत्मसन्मानाचा विजय

मोदी सरकारने केलेले कृषी कायदे सरकारला मागे घ्यावे लागणे हा बळीराजाच्या आत्मसन्मानाचा विजय

*कोकण Express*

*मोदी सरकारने केलेले कृषी कायदे सरकारला मागे घ्यावे लागणे हा बळीराजाच्या आत्मसन्मानाचा विजय*

*▪️शिवसेना नेते अतुल रावराणे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मोदी सरकारने केलेले कृषी कायदे सरकारला मागे घ्यावे लागणे हा बळीराजाच्या आत्मसन्मानाचा विजय आहे. केंद्र सरकारच्या जाचक अटींच्या विरोधात शेतकऱ्यांनी उभारलेले आंदोलन हानून पाडण्यासाठी केंद्राने सर्वतोपरी प्रयत्न करूनही शेतकरी मागे हटले नाहीत. त्यामुळे हा शेतकऱ्यांचा विजय म्हणजे केंद्र शासनाच्या झुंडशाहीविरोधात लोकशाहीचा विजय आहे. पुढील निवडणूकांमधील पराभव ओळखून जरी हा निर्णय घेतलेला असला तरीही पुढील काळात भाजपाची पिछेहाटच पहायला मिळेल, अशी टीका शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी वर्षभर नेटाने आंदोलन केले. आंदोलन चिरडून काढण्यासाठी केंद्र शासनाने सर्व प्रयत्न केले. शेकडो शेतकऱ्यांचे बळी गेले. लखीमपूरमध्ये पाच-सात शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. मात्र अनेकप्रकारे शेतकरी आंदोलनकर्त्यांचा छळ करूनही शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे मोदी सरकारला शेतकरीविरोधातील काळे कायदे मागे घेण्याची वेळ आलेली आहे. केंद्र सरकारचा हा नैतिक पराभव आहे. भाजपाने पुढील रणनिती ठरवून येत्या निवडणूकांत आपला पराभव होणार हे ओळखत हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसमोर सरकारला झुकावे लागले. पुढील काळात भाजपाची पिछेहाट अटळ आहे.

मोदी सरकारने हा निर्णय घेऊनही शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी जोपर्यंत पार्लमेंटमध्ये हे कायदे रद्द केल्याबाबतचा कायदा संमत होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे जाहिर केले आहे. याचाच अर्थ या सरकारच्या विश्वाईतेला तडा गेला आहे, हेच दिसून येते, असेही श्री. रावराणे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!