जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शपथ*

जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शपथ*

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शपथ*

*शिरगांव : संतोष साळसकर*

नशाबंदी मंडळ, जि. प. समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, व्यसन मुक्ती सल्ला केंद्र गोपुरी आश्रम यांच्या वतीने
केंद्र शासनाचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत नशा मुक्त भारत मादक द्रव्य सेवन विरोधी पंधरवडा साजरा करण्यात आला.

कणकवली, मालवण, देवगड , वेंगुर्ला तालुक्यातील निरनिराळ्या शिक्षण संस्था व सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक, कामगार यांच्याशी संवाद साधून अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करण्यात आली. प्रचार फेरी, पोस्टर प्रदर्शन, शपथ देणे, पथनाट्य यासह विविध कार्यक्रमांचा समावेश शाळा महाविद्यालय शासकीय नियम शासकीय कार्यालय आदी ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच केंद्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन सहभागींना प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. जिल्हा नशा मुक्ती सप्ताहाचे संयोजन नसबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता राजेंद्र मुंबरकर यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!