ओझरम येथे कोविड योध्यांचा गौरव : पंढरिनाथ एक्यवर्धक संघाचे आयोजन

ओझरम येथे कोविड योध्यांचा गौरव : पंढरिनाथ एक्यवर्धक संघाचे आयोजन

*कोकण  Express*

*▪️ओझरम येथे कोविड योध्यांचा गौरव : पंढरिनाथ एक्यवर्धक संघाचे आयोजन*

*▪️सेवा निवृत्त पोलीस अधीकारी राणे यांचा सपत्निक सत्कार*

*कासार्डे ः संजय भोसले*

ओझरम तिर्थवाडी येथील श्री पंढरिनाथ एक्यवर्धक संघाच्यावतीने कोविड योध्यांचा गौरव करण्यात आला. कार्तिकी एकादशीनिमित्त विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या योध्यांचा सत्कार करण्यात आला.

ओझरम तिर्थवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात सप्ताह साजरा करण्यात आला. सकाळी सप्ताहाला सुरुवात झाली. त्यानंतर स्थानिक भजने झालीत. श्री स्वामी समर्थ संगीत गृपचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महिलांचा हरिपाठ हा धार्मिक कार्यक्रम झाला.

यावेळी गेल्या दोन वर्षाच्या संघर्षमय काळात ज्यांनी कोरोनाची कोणतीही भिती न बाळगता या आपत्ती काळात मोलाचे सहकार्य केले अशा पोलिस, डॉक्टर, वाहनचालक आणि आरोग्य कर्मचारी यांना मन्डळाच्यावतीने शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

त्यानंतर दरवर्षीप्रमाणे पंचक्रोशीतील वारकरी भजने सादर झालीत. आणि काकड आरतीने या सप्ताहाची सांगता झाली. हे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मँड़ळाचे अध्यक्ष विद्याधर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र राणे, खजिनदार एकनाथ राणे, अरुण राणे, विलास राणे, नितीन राणे, प्रणेश राणे, प्रशांत राणे, विठ्ठल राणे, जितेंद्र राणे, दिपक राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!