*कोकण Express*
*▪️शालेय शिक्षण व साक्षरता विभाग,शिक्षण मंत्रायल नवी दिल्ली यांचे मार्फत कला उत्सवाचे आयोजन*
*▪️इयत्ता ९ वी ते १२वी मध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन पध्दतीने राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची नामी संधी*
*कासार्डे ः संजय भोसले*
माध्यमिक व उच्य माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यामधील प्रतीभा ओळखून त्यांच्यामधीलकला गुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग ,शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्फत २०१५—२०१६ पासून दरवर्षी कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते.यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेश आपला सहभाग नोंदवीत असतात यामध्ये सिंधुदुर्गमधील गुणवंत कलाकाराला आपली कला सादर करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.
या वर्षी म्हणजे सन २०२१—२०२२ मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्रीय गायन , पांरपारिक गायन, शास्रीय संगीत वादन, पांरपारिक लोक संगीत वादन, शास्रीय नृत्य, पांरपारिक लोक नृत्य, द्विमीतीय चित्र, त्रिमीतीय चित्र, शिल्प व स्थानिक खेळणी तयार करणे या नऊ कला प्रकारांचा समावेश केलेला आहे.त्यामुळे २०२१—२०२२ मध्ये राज्याच्या नऊ कला प्रकारांचे ९ संघ राष्ट्रीय पातळीवर होणार्या आॅनलाईन खला उत्सवासाठी १० डिसेंबर पर्यंत नामनिर्देश करू शकतात.राज्याचा संघ निवडीसाठी वरील सर्व नमूद केलेल्या कला प्रकारामध्ये आॅनलाईन स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत.
या कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या , सर्व व्यवस्थापनाच्या शाळा मधीलइयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. सर्व कला प्रकारामध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (सोलो) सहभाग तअसणार आहे. या उत्सवात भाग घेण्यासाठी आवश्यक असणारे निकष व अधिक माहीती विद्यार्थ्यानी http://www.kalautsav.in या वेबसाईटवर जाऊन मिळवावी .
सर्वप्रथम जिल्हा स्तरावरून निवडण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ठ संघामधून (९कला प्रकारातून ९ वीद्यार्थी मुलगे अथवा मुली) राज्यस्तरीय संघ निवडण्यात येईल. व राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना पुन्हा राज्य स्तरावर आॅनलाईन अथवा प्रत्यक्ष सादरीकरन करावे लागेल. तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा या आॅनलाईन पद्धतीने होणार असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या बाबत स्वतंत्र वैयक्तीकपणे कळवले जाईल

