*कोकण Express*
*▪️आप्पा पराडकर यांचे सामजिक कार्य कौतुकास्पद…!*
*▪️लोकार्पण प्रसंगी आम.वैभव नाईक यांचे गौरवोद्गार…!*
*▪️आप्पा पराडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी उपलब्ध करून दिली रुग्णवाहिका…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जनरल कामगार सेना नेते आप्पा पराडकर यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत.याबद्दल जिल्ह्याच्या वतीने श्री.पराडकर यांचे अभिनंदन करतो.त्याचा हा समजाउपयोगी उपक्रम यापुढे ही असाच सुरू रहावा.पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असून जिल्ह्यातील शिवसैनिक ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास आम.वैभव नाईक यांनी बोलताना व्यक्त केला.
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे लोकसभा संपर्कप्रमुख निलेश उर्फ आप्पा पराडकर यांच्या सौजन्याने सिंधदुर्गासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त रुग्णवाहिका देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय समोर आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव, तालुकाध्यक्ष शैलेश भोगले उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, राजू राठोड,युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू,कलमठ उपसरपंच वैद्यही गुडेकर,उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर,संदेश सावंत पटेल,भास्कर राणे,मंगेश सावंत, अनिल हळदीवे,रिमेश चव्हाण,अनुप वारंग,विलास गुडेकर, वैभव मालंडकर, पराग मापसेकर म्हापसेकर,अँड.चेतन पाटील,बाबूल शेख,ललित घाडीगांवकर,रोहिणी पिळणकर आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.