*कोकण Express*
*◾प्रतिभा नाटक मंडळींचे अध्यक्ष सुहास साळगावकर यांचे निधन*
*कासार्डे ः संजय भोसले*
प्रतिभा नाटक मंडळी गोवा तथा नाटक कंपनीचे अध्यक्ष व कणकवली तालुक्यातील ओझरम माळवाडी चे रहिवासी सुहास लक्ष्मीकांत साळगावकर वय ५५ यांचे बुधवारी २७रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.अतिशय हरहुन्नरी आणि चतुरस्त्र कलाकार म्हणून ते संपूर्ण कोकण पट्ट्यात व गोवा राज्यात प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली एक मुलगा,जावई, नातवंडे असा परिवार आहे.

