सिंधुदुर्ग दुग्ध संघाने घेतली जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंतांची भेट

सिंधुदुर्ग दुग्ध संघाने घेतली जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंतांची भेट

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग दुग्ध संघाने घेतली जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंतांची भेट…*

*बांदा ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन वाढीसाठी तसेच चारा व्यवस्थापनसाठी गावपातळीवर उपाययोजना राबविण्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्हा दुग्ध संघाच्या वतीने सकारात्मक चर्चा करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी श्री सावंत यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे तसेच बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित बांदा चे संचालक मंडळ उपस्थित होते. या चर्चेत बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष नारायण गावडे, उपाध्यक्ष शांताराम आकेरकर, सचिव मनोज सावंत, संचालक रत्नाकर आगलावे, प्रशांत गवस, अनिरुद्ध पिळणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!