*कोकण Express*
*भारत बंदला मालवण येथे काँग्रेसचा पाठिंबा*
*रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजीने केला केंद्र सरकारचा निषेध*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण दि प्रतिनिधी कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकऱ्यांनी केंद्रातील माेदी सरकारच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदच्या आंदोलनाला पाठिबा देण्याबरोबरच केंद्र सरकारचे कामगार विरोधी धाेरण आणि जनतेला खोटी आश्वासने देऊन पंतप्रधान मोदींनी बळकावलेली सत्ता याचा जोरदार निषेध आज मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसने मालवणात करीत मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार आज मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेसने तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांच्या नेतृत्वाखाली मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिरा समोर मोदी सरकार विरोधात आंदोलन केले यावेळी मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी, सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मेघशाम लुडबे, दिलीप तळगावकर, दिलीप तळगावकर, दिलीप मसुरकर, हरी खवणेकर, हेमेंद्र तळवडेकर, संजय धुरी, शेखर डिचोलकर, मधुकर लुडबे, हेमंत कांदळकर यांच्यासहित काँग्रेसचे सर्व फ्रंट चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.