सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळालेल्या रुग्णवाहिकांचे उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळालेल्या रुग्णवाहिकांचे उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिळालेल्या रुग्णवाहिकांचे उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण…*

*सिंधुदुर्ग*  

राज्य सरकारच्या आपत्ति व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका मिळाल्या असून या रुग्नवाहिकांचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका वितरित करण्यात आल्या आहेत. यातील ११ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत.त्याचबरोबर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १ , सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १ व पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला १ रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना रुग्णवाहिका देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली होती. ती मागणी पूर्ण करण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी व तळकट, कणकवली तालुक्यातील कनेडी, कुडाळ तालुकयातील कडावल, पणदूर, वालावल, मालवण तालुक्यातील गोळवण, सावंतवाडी तालुक्यातील निरवडे, सांगेली, वेंगुर्ले तालुक्यातील परुळे, रेडी या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.याआधीहि राज्यसरकाच्या माध्यमातून जिल्ह्याला रुग्णवाहिका देण्यात आल्या. राज्यसरकारकडे केलेल्या मागणीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र, व रुग्णालयांची गरज ओळखून पुन्हा एकदा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रूग्णवाहिकांचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, जिल्हाधिकारी के मंजु लष्मी, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर सभापती अनिशा दळवी यांच्यासह जिल्हा परिषद अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!