*कोकण Express*
*नगरपंचायतचा कारभार किती बेजबाबदार आहे?त्याचा पुन्हा प्रत्यय…*
*कणकवली नगरपंचायत गटनेता सुशांत नाईक*
*बाणेच्या दुकानातील आग विझवण्यासाठी दीड तासाने आला बंब; लाखो रुपयांच्या हाणीला नगरपंचायत जबाबदार.._*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायतचा कारभार किती बेजबाबदार आहे? त्याचा पुन्हा प्रत्यय आगीची दुर्घटना घडल्यावर आला. आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष समीर नलावडे हे नगरपंचायत सत्ता सांभाळू शकत नाहीत.त्यांचा प्रशासनावर अंकुश नाही हे पुन्हा एकदा दिसून आले. बाणे किराणा मालाचे दुकान जळाल्यानंतर पाठवलेल्या अग्निशामक बंबामध्ये पाणीच नव्हते. त्यानंतर तब्बल दीड तासाने बंब आला.कणकवली सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश नाही,अशी टीका कणकवली नगरपंचायत गटनेता सुशांत नाईक यांनी केली.
शहरात बाणे किराणा दुकानाला आग लागल्या नंतर पाच मिनिटात बंब तेथे पोहचायला हवा होता. पण शहरात भरबाजारपेठेत आग लागूनही बंब पोहचायला दीड तास लागला. बंब आल्यावर त्यात पाणी नाही त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ झाला. यामुळे बाणे यांचे १० लाखाचे नुकसान झाले. याला कणकवली नगरपंचायत जबाबदार आहे. माझ्याकडे नगरपंचायतची सत्ता द्या.. असे सांगणाऱ्या आमदार नितेश राणे हे सत्ता चालविण्यास असमर्थ ठरले असल्याची टीका सुशांत नाईक यांनी केली.
