*२७२ आरोग्‍य कर्मचाऱ्यांना काढल्‍यानंतर रुग्णांना सेवा कशी मिळणार…?*

*२७२ आरोग्‍य कर्मचाऱ्यांना काढल्‍यानंतर रुग्णांना सेवा कशी मिळणार…?*

*कोकण  Express*

*२७२ आरोग्‍य कर्मचाऱ्यांना काढल्‍यानंतर रुग्णांना सेवा कशी मिळणार…?*

*परशुराम उपरकर ; पालकमंत्री, आमदार गप्प राहून जनतेच्या आरोग्‍याशी खेळताहेत…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड सेंटरमधील २७२ अारोग्‍य कर्मचाऱ्यांच्या सेवा थांबविण्यात आल्‍या आहेत. मात्र आता तिसऱ्या लाटेचा धोका आहे. मोठ्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यात येणार आहेत. त्‍यामुळे आरोग्‍य कर्मचाऱ्यांच्या सेवा थांबवून, कोविड सेंटर बंद करून रूग्‍णांना सेवा कशी मिळणार असा सवाल मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज उपस्थित केला. तसेच या प्रश्‍नी खासदार, पालकमंत्री, आमदार गप्प राहून जनतेच्या जीवाशी खेळत असल्‍याचेही ते म्‍हणाले.
येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्‍यांच्यासोबत उपजिल्‍हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. श्री.उपरकर म्‍हणाले, कोविड रूग्‍णांना सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना राज्‍य शासनाने किमान डिसेंबर २०२१ पर्यत मुदत वाढ दिली पाहिजे होती. सरकारला तिसरी लाट येणार असे वाटत असेल तर त्यांचे नियोजन आताच केले पाहिजे. आता अतिरिक्त कर्मचारी कमी केल्यास,ते कर्मचारी व डॉक्टर पाहता परत हे या सेवेत येतील का नाही?अनुभवी हे लोक मिळतील का नाही?याची चिंता आहे.
ते म्‍हणाले, कोविड काळात सेंटरमध्ये जाऊन अनेक नेतेमंडळींनी फोटो काढले. रूग्‍णांसाठी कोविड सेंटरही उभी केली. या केंद्रांना अनेक दानशूरांनी साहित्‍य पुरविले. कोविड सेंटर बंद झाल्‍याने ही उपकरणेही बंद पडणार आहेत. ज्‍यावेळी तिसरी लाट येईल त्‍यावेळी कोविड केंद्रातील उपकरणे पुन्हा कशी जमविणार याचेही उत्तर शासनाने द्यायला हवे. गणेशोत्‍सवात मोठ्या संख्येने चाकरमानी येणार, यातील काही कोविड पॉझिटिव्ह निघाले तर त्‍यांना उपचारासाठी पुरेशी सरकारी हॉस्पीटल आहेत का? याचा शासनाने विचार केला पाहिजे.
खासगी कोविड सेंटरमधील सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, यासाठी मी मनसेच्या वतीने आरोग्य मंत्री व आरोग्य सचालकांना पत्र देणार आहे.कोकणी जनतेला शासन व लोकप्रतिनिधी फसवतात. कोकणी जनतेचे जीव गेले तरी फरक पडत नाही. इथला मंत्र्यांनी काढलेल्या कर्मचाऱ्यांना मुदत वाढ द्यावी, पुन्हा कोविड सेंटर चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत,अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!