*कोकण Express*
*वैभववाडी रेल्वे स्टेशन ते भुईबावडा एस.टी. बस ४ सप्टेंबर पासून सुरू होणार …*
वैभववाडी रेल्वे स्टेशन ते भुईबावडा एस.टी. बस गणपती उत्सवासाठी ४ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना बाप्पा पावला आहे.
वैभववाडी रेल्वे स्टेशन ते भुईबावडा एस.टी. बस गेले काही दिवस सुरू होती .कोकण रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्याना एस.टी.बस नसल्याने रिक्षा किंवा अन्य खाजगी वाहनाने प्रवास करणेस दामदुप्पट पैसे मोजावे लागत असत. उबर्डे गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री.सूर्यकांत मुद्रस यांनी मागणी करून पाठपुरावा केला होता.त्यामुळेच बस सुरू करण्यात आली होती.
गणपती सणांसाठी रेल्वेने चाकरमनी मोठ्या प्रमाणात येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुन्हा या मार्गावरुन एस.टी सुरू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग नियंत्रक कणकवली चे वाहतुक नियंत्रक हिरेन रेडकर यांची प्रत्येक्ष भेट घेऊन एस.टी.बस सुरू करण्याची मागणी केली होती.यावेळी श्री.रेडकर यांनी ४ सप्टेंबर पासून वैभववाडी रेल्वे स्टेशन ते भुईबावडा या मार्गावरील एस.टी.बस सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री उदय मुद्रस व ब्रह्मदेव सेवा मंडळाचे खजिनदार श्री संजय शिरसाट ब्रह्मदेव सेवा मंडळाचे सदस्य श्री विनय मुद्रस, श्री राजेंद्र मुद्रस, श्री श्रीकांत मुद्रस उपस्थीत होते.