केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार

*कोकण  Express*

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार…?*

*नाशिक पोलीस राणेंना अटक करण्यासाठी चीपळूणकडे रवाना*

*नाशिक,ता.२४:*

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली मारले असते,असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर नाशिक येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तात्काळ अटक करून न्यायालयात हजर करा, असे आदेश नाशिकचे पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार नाशिक पोलीस राणेंना अटक करण्यासाठी चीपळूणकडे रवाना झाले आहे. त्यामुळे आता नेमका शिवसेना आणि भाजपात कोणता वाद रंगतो,याचे पडसाद काय उमटतात, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे पोलिसांना सामोरे जातात का, स्वतःला अटक करून घेतात का,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!