भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या 3 सप्टेंबर रोजी येणार सिंधुदुर्गात

भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या 3 सप्टेंबर रोजी येणार सिंधुदुर्गात

*कोकण Express*

*भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या 3 सप्टेंबर रोजी येणार सिंधुदुर्गात*

*तळकोकणात सोमय्यांचा ” माऊथ बॉम्ब ” कोणावर पडणार ?*

*सिंधुदुर्ग*

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या 3 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गात येणार असल्याची खात्रीशीर माहिती राजकीय गोटातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे भ्रष्टाचारी आणि गल्लेभरू राजकीय लोकप्रतिनिधींची पोलखोल करण्यात माहीर आहेत. भाजपाचे मुंबईतील अत्यंत आक्रमक तेवढेच अभ्यासू नेते म्हणून किरीट सोमय्यांची ख्याती आहे. भाजपा पक्ष संघटन बांधणीसोबतच विरोधकांना सळो की पळो करण्यात त्यांचा हातखंडा आहे. भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढून अन्यायाला वाचा फोडणारा नेता म्हणून सोमय्यांकडे पाहिले जाते. सिंधुदुर्गात 3 सप्टेंबर रोजी येत असलेल्या किरीट सोमय्यांचा ” माऊथ बॉम्ब ” तळकोकणात कोणावर पडणार ? याचीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!