*कोकण Express*
*वाघेरीत 26 ऑगस्ट रोजी मधुमक्षिका प्रशिक्षण*
*वाघेरीत 26 ऑगस्ट रोजी मधुमक्षिका प्रशिक्षण*
*सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी*
मायोफा ऍग्रोटेक व्हेंचर्स प्रा. लिमिटेड कंपनीच्या वतीने २६ऑगस्ट रोजी कणकवली तालुक्यातील वाघेरी येथे शेतकऱ्यांसाठी मोफत मधुमक्षिकापालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मायोफा ऍग्रोटेक व्हेंचर्स प्रा. लि. हि कंपनी शेती व शेतीसंलग्न क्षेत्रामध्ये काम करत आहे. शेतीचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे कंपनीच्या मुख्य उद्देशांपैकी एक महत्वाचा उद्देश आहे. याच उद्देशातून शेतीपूरक व्यवसायांची आपल्या जिल्ह्यात वाढ व्हावी. यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कंपनीमार्फत होणार आहे. बाजारपेठेत शुद्ध मधाला खूप मागणी आहे. आणि आपल्या जिल्ह्यात मधुमक्षिका पालनाला खुप वाव आहे. त्याला चालना मिळणे गरजेचे आहे. आपल्या भागात नवीन मधुमक्षिका पालक तयार होऊन रोजगाराच्या नवीन संधी तयार करण्यासाठी २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:३० या वेळेत मधुमक्षिकापालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी ८६००६०५०४५ या क्रमांकावर संपर्क करावा.

