केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सूचनेवरून जिल्ह्याला जास्त प्रमाणात कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सूचनेवरून जिल्ह्याला जास्त प्रमाणात कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा

*कोकण  Express*

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सूचनेवरून जिल्ह्याला जास्त प्रमाणात कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हाला नजीकच्या सोलापूर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात लस उपलब्ध होत होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंख्या विचार करता इतर जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यासाठी फार कमी प्रमाणात लस उपलब्ध होत होती. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक असल्याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते. श्री राणे यांनी दिल्ली येथे अधिवेशन काळात व्यस्त कामकाजात असताना देखील तात्काळ दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सिंधुदुर्गसाठी कोविंशील्ड व कोव्हॅक्सिंन मिळून 17000 लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नारायण राणेंचे असलेले पालकत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर लस् डोस पुरवठ्याबाबत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत होणारा अन्याय जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे यापूर्वीच पत्राद्वारे मांडला होता. परंतु त्यांच्याकडून त्यावर कोणत्याही प्रकारची दखल देखील घेण्यात आली नाही. मोठ्या प्रमाणात लस पुरवठा होत असल्याने लवकरात लवकर शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण होणार असल्याने जिल्ह्यातील जनतेच्या वतीने नारायण राणे व अध्यक्ष सजना सावंत यांचे जनतेतून आभारव्यक्त केले जात असल्याचे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रूपेश कानडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!