शाळा कणकवली क्रमांक तीनचे शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश

शाळा कणकवली क्रमांक तीनचे शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश

*कोंकण एक्सप्रेस*

*शाळा कणकवली क्रमांक तीनचे शिष्यवृत्ती परीक्षेतील सुयश*

*शिरगांव : संतोष साळसकर*

कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय पीएम श्री जि प शाळा कणकवली क्रमांक तीन च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये उज्वल यश संपादन केले आहे
या शाळेतील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी मध्ये ओम आनंद हळवे हा विद्यार्थी 210 गुण मिळवून गुणवत्ता यादी 34 वा आला आहे तर संदेश दिलीप गावडे हा विद्यार्थी 204 गुण मिळवून गुणवत्ता यादीत 41 वा आला आहे हर्षिका सदानंद राणे 198 गुण, भार्गवी रवींद्र जाधव 162 गुण व जान्हवी निलेश पांचाळ 138 गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत तर इयत्ता चौथीचा शौर्य गणेश शिंत्रे हा विद्यार्थी 232 गुण मिळवून प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत एकतिसावा आला आहे तसेच दिव्या यशवंत माणगावकर 172 गुण हार्दिका सागर राणे 170 गुण
लक्ष्मी धराप्पा वाघमोडे 140 गुण यश रवींद्र पांगम 130 गुण व नील चंद्रकांत चव्हाण 198 गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका श्रीमती प्रतिभा कोतवाल, मुख्याध्यापिका सौ अक्षया राणे व श्री संजय तांबे यांचे मार्गदर्शन लाभले तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री निवृत्ती गुरव, श्री संतोष घाडीगावकर, सौ रुपाली डोईफोडे, श्री महेश पाटील, श्री संजय तांबे,सौ अश्विनी साटम, सौ सुरेखा सावंत यांचे मार्गदर्शन लाभले
शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अक्षया राणे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सायली राणे, उपाध्यक्ष श्री राकेश जाधव तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे सर्व पालक वर्गातून या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!