*कोंकण एक्सप्रेस*
*योगातून निरोगी जीवनाचा संदेश” : न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा*
*फोंडाघाट ः संजना हळदिवे*
न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाची सुरुवात योग दिनाचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन आणि ‘योग प्रार्थना’ म्हणून योगासन प्रात्यक्षिके करण्यात आली.त्यानंतर योग प्रशिक्षक प्रशालेतील योगशिक्षिका सौ.भोगले मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक सादर केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, एकाग्रता वाढते आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला
योग मार्गदर्शक श्री. दिलीप रावराणे , श्री. विजय नांदोडकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पारकर प्र. कृ, पर्यवेक्षक श्री. राठोड वि.पा. तसेच इतर शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. योगाच्या माध्यमातून निरोगी व सुदृढ व आनंदी जीवनाचा संकल्प करण्यात आला.
या उपक्रमाच्या सांगता समारोप प्रसंगी प्रशालेचे लिपिक श्री. मिलिंद जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व या कार्यक्रमाची सांगता योग मार्गदर्शक श्री. विजय नांदोडकर यांच्या ‘महाराष्ट्र गीत’ गायनाने करण्यात आली.

