खवल्या मांजर व सांबर शिंग तस्करी प्रकरणः संशयितांना 50 हजारांचा जामीन

खवल्या मांजर व सांबर शिंग तस्करी प्रकरणः संशयितांना 50 हजारांचा जामीन

*कोंकण एक्सप्रेस*

*खवल्या मांजर व सांबर शिंग तस्करी प्रकरणः संशयितांना 50 हजारांचा जामीन*

*संशयिताच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांचा युक्तिवाद*

*ओरोसः*

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्मिळ खवल्या मांजराचे खवले आणि सांबराच्या शिंगांची तस्करी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ओरोस येथील मा. मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. चेंडके यांनी 3 जून 2026 रोजी हा निर्णय दिला.

29 मे 2026 रोजी पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने छापा टाकून संशयितांना अटक केली होती. संशयितांनी कोणताही गुन्हा केला नसल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील अॅड. अशपाक शेख यांनी न्यायालयात केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संशयितांची 50,000/- रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात संशयितांच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी मुख्य काम पाहिले, तर अॅड. पंकज खरवडे यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!