अखेर मॉन्सून केरळमध्ये दाखल; कोकणात पावसाचा इशारा

अखेर मॉन्सून केरळमध्ये दाखल; कोकणात पावसाचा इशारा

*कोंकण एक्सप्रेस*

*अखेर मॉन्सून केरळमध्ये दाखल; कोकणात पावसाचा इशारा*

१० जूननंतर मात्र मान्सूनची पुढील वाटचाल संथ राहण्याची शक्यता आहे.

*त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस पोहोचण्यासाठी 20 जून उजाडण्याची शक्यता आहे.*

*मुंबई:*

सर्वांकरिता आनंदाची बातमी आहे. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला आहे.

याबाबत बोलताना हवामान विभागाचे तज्ञ प्रवीण कुमार यांनी म्हटले की, मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील 48 तासांत दक्षिण महाराष्ट्र त्यामध्ये कोकणमधील भाग तिथे पावसाचा अंदाज आहे, असं प्रवीण कुमार यांनी सांगितले.

दक्षिण महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात मान्सून दाखल होईल. उद्या संध्याकाळपर्यंत केरळचा बराचसा भाग हा मान्सूनने व्यापलेला असेल. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सूनने कर्नाटकच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल.

गोव्याच्या अक्षांशापर्यंत मजल मारण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत तळकोकणातही तो दाखल होण्याची शक्यता आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!