*कोंकण एक्सप्रेस*
*चाफेड भोगलेवाडी प्रशालेचा 7 मे रोजी सुवर्णमहोत्सवी समारंभ*
*याचवेळी या गावचे सुपुत्र सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय भोगले यांचा गावातर्फे नागरी सत्कार*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी प्रशालेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सव समारंभ गुरु. दि. 7 मे रोजी दु. 2 वाजता माजी विध्यार्थी संघांचे अध्यक्ष विजय भोगले यांच्या अध्यक्षतेखाली प्रशालेच्या रंगमंचावर आयोजित करण्यात आला आहे.
यां समारंभाचे उदघाटन देवगड पं. स. चे सभापती गणेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवगड पं. स. चे उपसभापती अमोल लोके, देवगड पं. स. चे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिणगारे,साळशी केंद्रबलाचे केंद्रप्रमुख सुगंध तांबे, चाफेड सरपंच साहिल पांचाळ, उपसरपंच महेश राणे, चाफेड तंटामुक्ती समिती अध्यक्ष सत्यवान भोगले, पोलीस पाटील संतोष सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यादिवशी स. 8 ते 10 वा. श्री सत्यनारायण महापूजा, 10 ते 11 वा. आरती, तीर्थप्रसाद, 11 ते 12 वा. जेष्ठ नागरिक सन्मान, 12 ते 2 वा. महाप्रसाद, दु. 2 ते 5 वा. मुख्य कार्यक्रम, ईशस्तवन, स्वागत पद्य, पाहुण्यांचे स्वागत, हस्तलिखित प्रकाशन, जमीनदारांचे सत्कार, पहिला व शेवटचा माजी विध्यर्थ्यांचा सन्मान, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय भोगले यांचा गावातर्फे सत्कार, माजी शिक्षकांचा सन्मान, मान्यवरांचा सत्कार, मनोगते, तसेच सायं. 5 ते 6 वा. भोगलेवाडी आणि पिंपळवाडी ग्रामस्थ्यांची भजने, 7 ते 8 वा. स्नेहभोजन, रात्रौ. 8 ते 9 वा. माजी विदयार्थी सुसंवाद, 9 ते 12 वा. माजी विदयार्थी यांचा विविध गुणदर्शनपर कार्यक्रम, त्यानंतर रात्रौ 12 नंतर सिद्धेश कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचे ट्रिक्सीनयुक्त ” पृथ्वीकंकण ” हे दशावतार नाटक सादर होणार आहे. तरी यां सुवर्णंमहोत्सवी सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी विध्यार्थी संघ शाळा चाफेड भोगलेवाडी चे अध्यक्ष विजय भोगले, सचिव महेश परब, खजिनदार प्रशांत राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल परब, मुख्याध्यापक दयानंद पांडे आणि ग्रामस्थांनी केले आहे.

