*कोंकण एक्सप्रेस*
*श्री केपादेवी वर्धापनदिन सोहळा 7 मे रोजी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
उभादांडा-मूठ येथील श्री केपादेवीचा वर्धापनदिन सोहळा गुरूवार दि. 7 मे रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
यानिमित्त सकाळी नित्यपूजा, अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी 12.30 ते 4 पर्यंत महाप्रसाद, सायं. 4 वा. भजन आणि रात्री 10 वाजता श्री गौतमेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ, दाभोली यांचा ‘सुनबाई तोऱ्यात’ हा दोन अंकी मालवणी कौटुंबिक तूफान विनोदी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन श्री केपादेवी देवस्थान कमिटी व विश्वस्त तसेच श्री केपादेवी देवस्थान उत्सव उपसमितीतर्फे केले आहे.

