एसटीच्या यंत्र कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर उपक्रम स्तुत्य

एसटीच्या यंत्र कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर उपक्रम स्तुत्य

*कोंकण एक्सप्रेस*

*एसटीच्या यंत्र कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर उपक्रम स्तुत्य*

*सुजित डोंगरे यांचे प्रतिपादन : कणकवलीत कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर*

*कणकवली ः संजना हळदिवे*

राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेसद्वारे प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी सेवा दिली आहे. ही सेवा देण्यामागे एसटीच्या यंत्र कामगारांचे योगदान मोठे आहे. या कामगारांसाठी कणकवली तालुका प्रवासी संघ, संजीवनी हॉस्पिटल, उद्योजक सुनील कोरगावकर यांनी आरोग्य तपासणी शिबिर घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. या शिबिरामुळे कामगारांचे आरोग्य सुदृढ राहून त्यांच्या हातातून प्रवाशांची सेवा होईल, असे प्रतिपादन राज्य परिवहन मंडळाच्या कणकवली विभागीय कार्याशाळेतील यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांनी केले.

कामगारदिनानिमित्त कणकवली तालुका प्रवासी संघ, संजीवनी हॉस्पिटल, उद्योजक सुनील कोरगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने रा. प. च्या कणकवली विभागीय कार्यशाळेतील यंत्र विभागातील कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व गुणवंत कामगारांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी श्री. डोंगरे बोलत होते. यावेळी प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, उद्योजक सुनील कोरगावकर, संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, सचिव सुभाष राणे, मोहन सावंत, एस. एल. सपकाळ, सुगंधा देवरुखकर, संजय मालंडकर, व्ही. के. चव्हाण, अमोल भोगले, डॉ. सुहास पावसकर आदी उपस्थित होते.

सुनील कोरगावकर म्हणाले, एसटी ही महाराष्टÑाची जीवनदायिनी आहे. एसटीतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. एसटीची यंत्रणा प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवास घडवून आणत आहे. त्यामुळे प्रवाशांची एसटीवर विश्वार्हता आहे. प्रवाशांना सुरक्षित व आरमदायी प्रवास करण्यासाठी सिंधुदुर्ग विभागातील यंत्र कामगार अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आम्ही आरोग्य तपासणी शिबिर घेतले आहे. मी एक उद्योजक असून सामाजिकदायित्व म्हणून उद्योगातून मला मिळणाºया नफातील १० टक्के रक्कम मी समाजोपयोगी उपक्रमांसाठी राखीव ठेवते. ती रक्कम समजोपयोगी उपक्रमांसाठी खर्च करतो. वैश्य वाणी पतसंस्थेचे रोपटे आम्ही समाजबांधवांनी एकत्र येऊन लावले होते. आता हे रोपटे वटवृक्ष झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

मनोहर पालयेकर म्हणाले, प्रवाशांच्या हित व त्यांच्या हक्कांसाठी कणकवली तालुका प्रवासी संघटना काम करीत आहेत. एसटीतून प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवास घडवून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाºया यंत्र विभागातील कामगारांसाठी आम्ही आरोग्य शिबिर घेतले आहे. कारण त्यांचे आरोग्य सुदृढ असेल तर एसटी बस लाईफ चांगले राहील. प्रवास संघ दरवर्षी विविध उपक्रम राबवत आहे. एसटी, खासगी वाहने, रेल्वेतून प्रवास करणाºया प्रवाशांसाठी समस्या सोडविण्यासाठी अवितरपणे संघ काम करीत आहे. एसटीच्या कर्मचाºयांनी आपले आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी केली पाहिजे. तसेच शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ कामगारांनी घेतला पाहिजे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आयुषमान हे कार्ड काढावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अ‍ॅड. संदीप राणे, एस.एल. सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केली. त्यानंतर कामगार दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सुशील कदम, दत्ताराम बेळणेकर, सुहास गावकर, संतोष सांगावेकर सुशील रामचंद्र कदम, विलास कदम, विद्याधर कुडतरकर यांचा सत्कार करण्यात आला. आरंभी मान्यवरांचे स्वागत मनोहर पालयेकर यांनी केले. शेवटी आभार रमेश जोगळे यांनी मानले. यावेळी एसटीच्या यंत्र विभागातील कामगार उपस्थित होते. तत्पूर्वी आरोग्य शिबिराचे यांच्या सुनिल डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मनोहर पालयेकर, उद्योजक सुनील कोरगावकर, रमेश जोगळे, एस.एस.सपकाळ, सुगंधा देवरूखकर, डॉ. सुहास पावसकर, डॉ. सर्वेश तायशेटे, व्ही. के.चव्हाण, अमोल भोगले, सुभाष राणे यांच्यासह एसटीचे कामगार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!