वैभववाडीत आकांक्षा खाडे तालुक्यात प्रथम

वैभववाडीत आकांक्षा खाडे तालुक्यात प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*वैभववाडीत आकांक्षा खाडे तालुक्यात प्रथम*

*वैभववाडी तालुक्याचा बारावीचा ९७.९७ टक्के निकाल*

*वैभववाडी ( प्रतिनिधी)*

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (ता. २) दुपारी जाहीर झाला असून वैभववाडी तालुक्याचा एकूण निकाल ९७.९७ टक्के लागला आहे. आकांक्षा अजित खाडे हिने ९०.१७टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आहे निहारिका विठोजी पाटील (९०,०० टक्के) हिने द्वितीय तर संपदा प्रीतम जाधव (८९.३३ टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक कै हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटाकावले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन

निकाल आज जाहीर झाला. याहीवर्षी निकालात मुलींनीच बाजी मारली. तालुक्यातील तीन कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण ३४६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी प्रथमच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने निकालाबाबत उत्सुकता वाढली होती. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणेः

कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय, वैभववाडी या महाविद्यालयाचा तिन्ही शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला शाखा: ४० पैकी ४० उत्तीर्ण प्रथमः निहारिका विठोजी पाटील (९०.००%), द्वितीयः संपदा प्रीतम जाधव (८९.३३%), तृतीयः रिया चंद्रकांत माळकर (७१.८३%) वाणिज्य शाखा ७९ पैकी ७९ उत्तीर्ण प्रथम आकांक्षा अजित खाडे (९०.१७%), द्वितीय पायल प्रदीप लिंगायत (८७.१७%), तृतीयः

तृष्णा संदीप घाडी (८५.१७%) विज्ञान शाखा : ८७ पैकी ८७उत्तीर्ण प्रथम : गौरी संजय चव्हाण (७९.८३%), द्वितीय: यश अशोक पाटील (७९.००%), तृतीय : प्रिती नितीन रावराणे (७७.००%) कनिष्ठ महाविद्यालय, आचिर्णे : वाणिज्य शाखा : ३१ पैकी २९ उत्तीर्ण (९३.५५%) प्रथम : समिक्षा रामदास शेलार (७६.५०%), द्वितीयः रोशनी रविंद्र शिंदे (७२.१७%), तृतीयः सिद्धी चंद्रकांत मांडवकर (६६.१७%) विज्ञान शाखाः ९५ पैकी ९४ उत्तीर्ण (९८.९४%) प्रथम : श्रेया संदीप शेळके (८३.००%), द्वितीय : सखाराम मोतीराम गुरखे (७५.८३%), तृतीय श्रुती संतोष कदम (६९.००%)

छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेर्ले-तिरवडे एकूण १४ पैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण (९२.८३%). कला शाखा प्रथम सिद्धिका हरिश्चंद्र गुरव (६६.३३%), द्वितीय पूजा दशरथ सुतार (५६.८३%), तृतीय ऋतुजा संतोष आयरे (५३.८८%)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!