*३० एप्रिल रोजी कणकवलीत भाजप महिला मोर्चाची ‘आक्रोश,निषेध पदयात्रा’*

*३० एप्रिल रोजी कणकवलीत भाजप महिला मोर्चाची ‘आक्रोश,निषेध पदयात्रा’*

*कोंकण एक्सप्रेस*

*३० एप्रिल रोजी कणकवलीत भाजप महिला मोर्चाची ‘आक्रोश,निषेध पदयात्रा’*

*‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन*

* मंत्री नितेश राणे होणार पदयात्रेत सहभागी*

* जाणवली नदी वरून होणार निषेध पदयात्रेला सुरवात*

*कणकवली ः संजना हळदिवे*

केंद्र सरकारने महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आणलेल्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, सिंधुदुर्ग च्या वतीने गुरुवारी ३० एप्रिल रोजी कणकवली शहरात भव्य ‘आक्रोश निषेध पदयात्रे’ चे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी करणार आहेत. ही आक्रोश पदयात्रा गुरुवारी ३० रोजी सायंकाळी ठीक ४:०० वाजता कणकवली – जानवली नदीजवळील मनोहर शिल्प मॉल येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत होणार आहे.

केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलत महिलांना आरक्षणाचा हक्क देणारा नारीशक्ती वंदन कायदा मंजूर केला आहे. मात्र, या विधेयकाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवल्याने महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महिलांच्या हक्काचा आणि सन्मानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भाजप महिला मोर्चा आता आक्रमक झाली असून, पदयात्रेच्या माध्यमातून हा रोष व्यक्त केला जाणार आहे

ही आक्रोश पदयात्रा गुरुवारी, आज सायंकाळी ठीक ४:०० वाजता कणकवली येथील जानवली नदीजवळील मनोहर शिल्प मॉल येथून सुरू होईल. त्यानंतर ही पदयात्रा मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचेल व पदयात्रेचा समारोप होईल.

या पदयात्रेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधी आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

नारीशक्तीचा सन्मान करणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी तसेच भाजप महिला मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि जिल्ह्यातील माता-भगिनींनी या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन काँग्रेसच्या निषेधार्थ आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन भाजप महिला मोर्चा, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!