कणकवलीत 1 मे रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

कणकवलीत 1 मे रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत 1 मे रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा…!*

*श्री स्वयंभू मंदिरात 12 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन…!*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार 1 मे रोजी सकाळ पासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी 5.30 वाजता निमंत्रित भजन मंडळांची जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली आहे.

1 मे रोजी सकाळी 9 वाजता धार्मिक विधी, ब्रह्मरुंदाच्या उपस्थितीत रुद्र स्वाहाकार, दुपारी 1 वाजता महाआरती, 1.30 वाजता महाप्रसाद होईल. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता निमंत्रित भजन मंडळांची भजन स्पर्धा होईल. यात सायंकाळी 6 वाजता श्री कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुदुकचे बुवा सुजित परब यांचे भजन, 7 वाजता श्री देव ठिकाणदार प्रासादिक भजन मंडळ, वरेरी-राणेवाडीचे बुवा हर्ष राणे यांचे भजन, रात्री 8 वाजता श्री लक्ष्मी नारायण प्रासादिक भजन मंडळ, वालावलचे बुवा सूरज लोहार यांचे भजन,9 वाजता श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ,वैभववाडीचे बुवा विराज तांबे यांचे भजन, 10 वाजता श्री सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ,जानवलीचे बुवा दुर्गेश मिठबावकर यांचे भजन, 11 वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळीचे बुवा प्रसाद आमडोसकर यांचे भजन होईल. याकार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गावपुरुष (जाणते), बारापाच मानकरी व कणकवली शहरातील ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!