*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्गात शिवसेनेची शक्तीप्रदर्शन बैठक; नगरपंचायत निवडणुकीसाठी रणनिती निश्चित..*
*दोडामार्ग :शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यात शिवसेना पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच व शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आगामी दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, गोपाळ गवस, जिल्हा परिषद सदस्या सौ. तळवणेकर, तालुका प्रमुख तथा उपसभापती गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सदस्या सौ. सायली निंबाळकर, नेहा गवस तसेच दोडामार्ग सरपंच सेवा संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल शेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत नगरपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आमदार निलेश राणे यांनी प्रभागनिहाय नियोजन, जनसंपर्क वाढवणे व संघटनात्मक समन्वय याबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

