*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत ‘अंतर ज्ञान प्रक्रिया’ (प्रज्ञा योग) शिबिराचे आयोजन*
**8 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी उपयुक्त शिबिर ; श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतील शिबिराचा उपक्रम*
*कणकवली ः संजना हळदिवे*
आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या वतीने अंतर ज्ञान प्रक्रिया (प्रज्ञा योग) या विशेष शिबिराचे आयोजन कणकवली येथे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या शिबिरात श्री श्री रविशंकर यांनी 8 ते 18 वयोगटातील मुला–मुलींसाठी हा अतिशय चांगला कोर्स तयार केला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे शिबिर कणकवली येथील उत्कर्षा हॉल एसटी स्टॅंड समोर 2 ते 5 मे 2026रोजी सकाळी 8 ते 1 वाजता वैयक्तिक हजर राहून होईल. त्यानंतर 6 ते 12 मे या कालावधीत ( 7 दिवस ऑनलाईन सराव झूम मीटिंगवर ) अशी माहिती प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी दिली.
हे शिबिर गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आले असून, मुलांच्या अंतःप्रज्ञा (Intuition) क्षमतेचा विकास करण्यावर या उपक्रमाचा भर असतो. या प्रक्रियेद्वारे मुलांमध्ये एकाग्रता, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि सर्जनशीलता वाढविण्यास मदत होणार आहे. या
शिबिरामध्ये योग, प्राणायाम, ध्यान तसेच मेंदू सक्रिय करणारी विविध तंत्रे शिकवली जाणार आहेत. या तंत्रांच्या माध्यमातून मुलांना तणावमुक्त राहणे, अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. तसेच खेळ, गटचर्चा आणि मनोरंजक उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. अंतर ज्ञान प्रक्रिया हा केवळ योग शिबिर नसून मुलांच्या अंतर्गत क्षमतांना जागृत करणारा एक अनोखा उपक्रम आहे. नियमित सरावामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात आणि त्यांची बौद्धिक तसेच भावनिक प्रगती घडते, असे श्री. वायंगणकर यांनी सांगितले. इंट्यूशन प्रोसेस कोर्सचे फायदे : मुले प्रतिबंधमुक्त होतात , जन्मजात प्रतिभा शोध , संवाद कौशल्यात सुधार , अधिक सर्जनशीलता, मजबूत स्मरणशक्ती, सहावी संवेदना वाढवते (6th Sense) , उत्तम स्मरणशक्ती , एकाग्रतेत सुधार, अभ्यासात आवड निर्माण होते, उत्तम वैचारीक स्पष्टता व निर्णय क्षमता ,भीती दूर करण्यासाठी मदत होणार आहे.
या शिबिरासाठी पालकांनी आपल्या मुलांची नोंदणी करण्यासाठी 08 ते 12 वयोगटातील मुलांसाठी नाव नोंदणी लिंकhttps://www.artofliving.online/registration.php event_id=1003912&ct_id=911&pkg_id=13929 व 13 ते 18 वयोगटातील मुलांसाठी नाव नोंदणी लिंक https://www.artofliving.online/registration.php event_id=1003917&ct_id=912&pkg_id=13930 यावर नोंदणी करावी. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://youtu.be/h_bq8gqWxyE या लिंकवर क्लीक करुन कोर्स बद्दल माहिती घ्यावी , असे आवाहन प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क – 9657479866, 8550966429 , 9168340403 , 9422393963 , 9763100229 , 7798100141 , 7218466206 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

