*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत प.पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमाचा १३ वा वर्धापनदिन सोहळा साजरा होणार*
*१८ व १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीया निमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम*
*मिरवणूक, महापूजा, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन*
*कणकवली ः संजना हळदिवे*
प.पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रम, कणकवली येथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तसेच कणकवलीत प.पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमाच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार, दि. १८ एप्रिल व रविवार, दि. १९ एप्रिल रोजी होणार असून भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शनिवारी १८ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत श्री गणेश मूर्तीवर तसेच श्री भालचंद्र बाबांच्या पादुकांवर अभिषेक होणार आहे. सायंकाळी ७ वाजता ॐ श्री गुरुवर्य फलाहारी बाबा यांचे कणकवली येथे आगमन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ८ वाजता श्री स्वयंभू मंदिर ते विश्रांतीधाम आश्रमपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता आरती व महाप्रसाद होणार आहे.
रविवारी १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर कणकवलीत प.पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमाच्या १३ वा वर्धापनदिन सोहळा साजरा होणार आहे. सकाळी ६ ते ८ या वेळेत भूपाळीसंग्रह काकड आरती व मंगलारती होणार आहे. सकाळी ९ ते १० या वेळेत श्री रामरायांच्या मूर्तीवर अभिषेक होणार आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व ॐ श्री गुरुवर्य फलाहारी बाबांची पाद्यपूजा होणार आहे.
सकाळी १०:३० ते १२ वाजता भक्तीसंगीत सौ प्रिया लक्ष्मीकांत नाईक व सौ रतन दशरथ नाईक फोंडा गोवा, १२ ते १ वाजेपर्यंत सुश्राव्य भजन बुवा चिन्मय गिरीष सावंत , कणकवली, दुपारी १ ते ३:३० वाजता मध्यान्हारती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद ( महाप्रसाद : कै. सुलता कमलाकर चोडणकर यांच्या स्मरणार्थ विश्वास कमलाकर चोडणकर – गोवा कुटुंबीयांमार्फत), सायंकाळी ७ ते ९:३० वाजता सुश्राव्य किर्तन ह.भ.प सदाशिव बुवा पाटील आंदूर्ले, कुडाळ, रात्री ९:३० ते १०:३० वाजता आरती, महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प.पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रम च्या वतीने करण्यात आले आहे.

