कोकण समृद्धी महोत्सवाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत मुरगुड कोल्हापूरचा डंका!

कोकण समृद्धी महोत्सवाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत मुरगुड कोल्हापूरचा डंका!

*कोंकण एक्सप्रेस*

*कोकण समृद्धी महोत्सवाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत मुरगुड कोल्हापूरचा डंका!*

*नारायणराव राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात रंगला क्रीडा महोत्सव*

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह भरणारा ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ अंतर्गत आयोजित भव्य राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार नुकताच वेंगुर्ला येथे पार पडला. खासदार, माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री ना. नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात मुरगुड कोल्हापूर संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग पुरस्कृत आणि जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने आयोजित ही भव्य स्पर्धा प्रकाशझोतातील होती. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील तसेच गोवा राज्यातील १८ नामवंत संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून खेळाचा दर्जा उंचावला.

वेंगुर्ल्यातील ऐतिहासिक कॅम्प मैदानावर व्हॉलीबॉलचा महासंग्राम पाहायला मिळाला. उपांत्य आणि अंतिम फेरीतील सामने अत्यंत अटीतटीचे झाले. विजेत्या संघांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक प्रणव वायंगणकर यांच्या हस्ते रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले:

प्रथम क्रमांक (रु. २०,००० + चषक): मुरगुड कोल्हापूर

द्वितीय क्रमांक (रु. १०,००० + चषक): जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला

तृतीय क्रमांक (रु. ५,००० + चषक): एम.सी.सी. सावंतवाडी

चतुर्थ क्रमांक (रु. ५,००० + चषक): ऑल आंबेशेत, रत्नागिरी

स्पर्धेत आपल्या वैयक्तिक कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या खेळाडूंना खालीलप्रमाणे गौरवण्यात आले:

बेस्ट सेटर: हर्षवर्धन कांदळकर

बेस्ट अटॅकर: सॅमसन फनांडिस

इमर्जिंग प्लेयर: अमन पटेल

प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: प्रज्वल मुनकर .

पंचांच्या भूमिकेत हेमंत गावडे, राधाकृष्ण पेडणेकर, ओंकार पोयरेकर आणि स्वराज सावंत यांनी चोख कामगिरी बजावली तर समालोचक सुमित मांजरेकर यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे विविध पदाधिकारी, क्रीडा प्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या क्रीडा सोहळ्याने तरुणाईमध्ये नवा उत्साह भरला असून, वेंगुर्ल्याच्या क्रीडा परंपरेत एका सुवर्ण अध्यायाची भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!