चार ग्रा. पं. च्या पोटनिवडणुकींसाठी ७ अर्ज

चार ग्रा. पं. च्या पोटनिवडणुकींसाठी ७ अर्ज

*कोंकण एक्सप्रेस*

*चार ग्रा. पं. च्या पोटनिवडणुकींसाठी ७ अर्ज*

*मठ, परुळेबाजार, चिपी व मेढा ग्रा.पं. पोटनिवडणूक : चिपीत एकमेव अर्ज दाखल : मेढा येथे एकही उमेदवारी अर्ज नाही*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

वेंगुर्ला तालुक्यातील मठ, परूळेबाजार, चिपी व मेढा या चार ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या एकूण ५ जागांकरीता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी लावलेल्या पोटनिवडणुक कार्यक्रमांतर्गत सोमवारी ७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयात सादर केली आहेत. मात्र, मेढा ग्रामपंचायतीच्या एका जागेकरीता एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
मठ ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक २ मध्ये ना.मा.प्र. महिला व प्रभाग ३ मध्ये महिला राखीव, परुळेबाजार प्रभाग क्रमांक ३ मध्ये महिला राखीव पद, चिपी प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण एक पद तर मेढा ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक २ मधील सर्वसाधारण १ पद अशी ५ जागांची पोटनिवडणूक कार्यक्रम सुरू झाला.
ग्रामपंचायतींमधील रिक्त सदस्यांच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, वेंगुर्ले तहसील कार्यालयात मठ प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या रिक्त जागेसाठी कविता आशिष घोलेकर व पूनम नरेश बोवलेकर असे दोन उमेदवारी अर्ज, प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण स्त्रीसाठी सुप्रिया सुशांत गावडे व दर्शना दिनेश नाईक असे दोन उमेदवारी अर्ज, परुळेबाजार प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण स्त्री जागेकरीता रश्मी वासुदेव सामंत व अपेक्षा अंकुश दादगे, असे दोन उमेदवारी अर्ज, चिपी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण जागेकरीता संदेश चंद्रकांत करंगुटकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. तर मेढा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ या सर्व साधारण जागेकरीता एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. चार ग्रामपंचायतींच्या ५ जागांकरिता एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत तर मेढा ग्रामपंचायतीच्या रिक्त जागेकरीता एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
सोमवारी पोटनिवडणूक कार्यक्रमांतर्गत मठ ग्रामपंचायतीमधील दोन रिक्त जागांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसमवेत आडेली पंचायत समितीचे विद्यमान सदस्य नितीन मांजरेकर, मठ सरपंचा रूपाली नाईक, ग्रामपंचायत सदस्या शमिका मठकर, अजित नाईक, संतोष परब, उमेश धुरी, महेश धुरी, रवींद्र खानोलकर, प – काश हरी ठाकुर, मनोहर गावडे, मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, सखाराम ठाकुर, विठ्ठल गावडे, सुरेश धुरी, सचिन आईर, रामचंद्र सावंत साईल परब उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!