*कोंकण एक्सप्रेस*
*“वचनपूर्ती – प्रजासत्ताक दिनी वंचितांच्या घरी प्रकाश*
*नगराध्यक्ष मा. संदेशजी पारकर व नगरसेवक लुकेश कांबळे यांच्या पुढाकारातून प्रजासत्ताक दिनी गरीब कुटुंबांच्या घरात वीज कनेक्शन देण्यात आले*
वनिता महादेव कांबळे,
सरिता गोपाळ हिंदळेकर,
चंद्रभागा जाधव.
या कुटुंबांच्या घरात आजपर्यंत वीज नव्हती. यापैकी एक रमाई घरकुल (२०१६–१७) तर दुसरे घरकुल (२०२२–२३) असूनही वीज कनेक्शन मिळाले नव्हते. जाधव यांच्या घराला तर गेल्या ४–५ दशकांपासून वीज कनेक्शन नव्हते.
नगरपंचायत निवडणुकीत निवडून आल्यानंतर “२६ जानेवारीला मीटर बसवू” असा दिलेला शब्द आज पूर्ण करण्यात आला.
यावेळी समाज भुषण तानाजीराव कांबळे, समतादुत adv.सुदीप कांबळे,जयश्रीताई कांबळे,उमेश वाळके,सौरभ पारकर, श्रीपाद सापळे, सतीश कांबळे,बाबुराव कांबळे, अनिल जाधव,समीर कांबळे,राजरतन कांबळे,पंढरी जाधव,विलास कांबळे,गौतम कांबळे,सत्यवान कासले.गणेश जाधव. संदीप ओंबळकर व विजतरण क॔पनीचे कर्मचारी उपस्थित होते.
सेवाभाव, संवेदनशीलता आणि विकासाची ठोस पावले – हेच आमचे ध्येय.

