सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिराचे आयोजन – उदय नाडकर्णी

सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिराचे आयोजन – उदय नाडकर्णी

*कोंकण एक्सप्रेस*

*सामाजिक बांधिलकीतून रक्तदान शिबिराचे आयोजन – उदय नाडकर्णी*

*गणेश जयंती निमित्त विविध उपक्रमांचा शुभारंभ ; ओम साई देवस्थान कमिटीच्यावतीने धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*

*कणकवली ः संजना हळदिवे*

ओम साई देवस्थान कमिटीच्यावतीने सामाजिक बांधिलकी ठेवत रक्तदानाचा हा संकल्प गेली 7 वर्षे सातत्याने आम्ही करत आहोत. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे , त्यामुळे जीवदान देण्याचं काम रक्तदात्यांनी केलेलं आहे. आमच्या ओमसाई देवस्थानच्यावतीने गणेशजयंती उत्सव गेल्या 20 वर्षापासून सुरु केला आहे. धार्मिक , सांस्कृतिक विविध उपक्रम यानिमित्त होत असतात. त्यामुळे या उपक्रमांना चांगला प्रतिसाद लाभतो , असे मत मंडळाचे विश्वस्त उदय नाडकर्णी यांनी केले.
कलमठ बिडयेवाडी येथील ओम साई देवस्थान कमिटीच्यावतीने रक्तदान शिबिराचा शुभारंभ ज्येष्ठ कार्यकर्ते अजित पवार व विश्वस्त उदय नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्ष संजय पुजारे, उपाध्यक्ष संदीप म्हाडगुत , पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , निनाद नाडकर्णी , ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग ,मल्लाप्पा मस्तमर्डी, एकनाथ मेस्त्री ,नागेश मेस्त्री ,संजय गुरव ,अभिजीत लाड ,भूषण पवार, तेजस लाड ,जयेश नेवगी, मयूर लाड ,संतोष मेस्त्री व सिंधुदुर्ग रक्तपिढीचे डॉ. स्वप्नील चव्हाण , डॉ. मोहित दाताळ, निता आरोलकर, नागेश पवार, जोसेफ पिंटो, प्रांजली पावसकर , विजय निरुखेकर , नितेश पाटील, नितीन गावकर आदी उपस्थित होते.

गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रम –

कलमठ -बिडेवाडी येथील गणेश व साई मंदिरात बुधवार २१ ते गुरुवार २२ रोजी माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ९ ते १२ वा. रक्तदान शिबिर, सायं. ५ ते ७ वा. लहान मुलांचे व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ९ वा. रेकॉर्ड डान्स, गुरूवार २२ जानेवारी रोजी पहाटे ५.३० वा. काकड आरती ५.३० वा., सकाळी ७ वा. अभिषेक पूजा, ९ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी ३ ते रात्री ८ वा. सुस्वर भजने, रात्री ९.३० वा. समई नृत्य ब्राम्हणदेव महिला मंडळ, नाद भोळेवाडी, ता. देवगड यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन ओम साई देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!