नववर्षाच्या निमित्ताने निरंकारी सतगुरूंचा आनंद व आशीर्वादांनी परिपूर्ण पावन संदेश

नववर्षाच्या निमित्ताने निरंकारी सतगुरूंचा आनंद व आशीर्वादांनी परिपूर्ण पावन संदेश

*कोंकण एक्सप्रेस*

*नववर्षाच्या निमित्ताने निरंकारी सतगुरूंचा आनंद व आशीर्वादांनी परिपूर्ण पावन संदेश*

*निरंकाराच्या रजेमध्ये जीवन जगणे हीच खरी साधना आहे
— निरंकारी सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज*

*सिंधुदुर्ग, ०३ :*

“निरंकार प्रभूच्या इच्छेमध्ये जीवन जगणे हीच खरी साधना आहे.” असे प्रेरणादायी उद्गार निरंकारी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी नववर्षाच्या शुभप्रसंगी विशेष सत्संग समारंभात व्यक्त केले. या सत्संगात विविध राज्यांतील हजारो श्रद्धाळूंनी सहभाग घेतला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सतगुरु माता जी व निरंकारी राजपिता जी यांच्या पावन सान्निध्यात दिव्य दर्शन व प्रेरणादायी प्रवचनांद्वारे सर्व भक्तांनी आत्मिक शांती व आध्यात्मिक ऊर्जेचा आनंद अनुभवला.
सतगुरु माता जी यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले की नववर्षाचा पहिला दिवस संतांच्या वचनांचे श्रवण करून ते जीवनात आत्मसात करण्याची अमूल्य संधी देतो. जिथे संसार नववर्षाची सुरुवात मौजमजेने करतात, तिथे संत सत्य आणि सत्संगाचा मार्ग स्वीकारतात. सत्संगातून प्रारंभ झालेले जीवन प्रत्येक क्षणी निरंकाराच्या अनुभूतीला अधिक दृढ करत जाते.
तार्किक दृष्टीने पाहता नववर्ष म्हणजे केवळ पृथ्वीने सूर्याभोवती केलेली एक प्रदक्षिणा आणि ऋतूंचा बदल आहे. आपण शुभेच्छा देतो आणि नवे संकल्प घेतो; परंतु खरा परिवर्तन तेव्हाच अर्थपूर्ण ठरतो, जेव्हा तो अंतःकरणातून घडतो. संत आत्ममंथनाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात आणि निरंकाराला सर्वोच्च मानून सेवा, सुमिरन व सत्संग यांना जीवनाची प्राथमिकता देतात.
सतगुरु माता जी म्हणाल्या की प्रत्येक भक्ताची हीच इच्छा असते की प्रत्येक नवे वर्ष त्याला पूर्वीपेक्षा अधिक दृढतेने सेवा, सिमरण व सत्संगाशी जोडून ठेवण्याबरोबरच आपल्या सांसारिक जबाबदाऱ्याही पूर्ण निष्ठेने पार पाडता याव्यात. जेव्हा जीवनच संदेश बनते आणि शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी ठरतात, तेव्हाच खरी साधना प्रकट होते. याच क्षणी, पूर्ण जागृत अवस्थेत, निरंकाराच्या अनुभूतीत जगणे हेच खरे जीवन आहे, कारण भूतकाळ आणि भविष्य हे मायेचे स्वरूप आहे. जेव्हा मनात हा विश्वास दृढ होतो की कालही ईश्वराची मर्जी होती आणि आजही त्याचीच कृपा आहे, तेव्हा चिंता आपोआप दूर होते आणि जीवन सहज व संतुलित बनते.
नववर्ष म्हणजे केवळ तारखेतील बदल नाही, तर प्रेम, गोडवा, सौम्यता आणि समजूत स्वीकारण्याची संधी आहे. मनमुटाव आणि द्वेषापासून दूर राहून, इतरांच्या भावना समजून घेत, दोषांवर पडदा टाकून गुणांना स्वीकारणे हीच खरी भक्ती आहे. प्रत्येक श्वासात प्रभूचे ध्यान बनून राहावे, प्रत्येक क्षणी निरंकाराचा निवास हृदयात कामय राहावा, हाच नववर्षाचा खरा अर्थ आणि संदेश आहे. नववर्षाच्या निमित्ताने सतगुरु माता जी यांनी शेवटी सर्व श्रद्धाळूंना सुख, समृद्धी आणि आनंदमय जीवनाच्या शुभेच्छा प्रदान केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!