*कोंकण एक्सप्रेस*
*क्रीडा स्पर्धेत बोडदे शाळेची घवघवीत भरारी..*
*दोडामार्ग / शुभम गवस*
शैक्षणिक वर्ष २०२५–२६ अंतर्गत झालेल्या प्रभा गटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बोडदे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत मोठा गट ‘ज्ञानी मी होणार’ या प्रकारात कु. सान्वी गुरुदास सावंत व कु. श्रावणी गणपत गवस यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
१०० मीटर धावणे (मोठा गट) या प्रकारात गौतम सोरेन याने द्वितीय क्रमांक मिळविला.
गोळा फेक प्रकारात सर्वांग रामचंद्र गवस, तर उंच उडी प्रकारात सान्वी गुरुदास सावंत यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
लांब उडी प्रकारात गौतम सोरेन याने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच कबड्डी (मुली) संघानेही द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या यशाबद्दल बोडदे शाळेचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा साक्षी संदिप नाईक, समिती सदस्य व पालकवर्ग, हरिश्चंद्र नाईक (सरपंच) व ग्रामपंचायत सदस्य बोडदे, तसेच साटेली प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत नाईक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मार्गदर्शक शिक्षक गोपाळ पाटील, मंजुश्री परब व महेश नाईक यांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक करण्यात आले असून, सर्वांनी विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

