पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडीत “विश्रांती कट्टा” चे लोकार्पण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडीत “विश्रांती कट्टा” चे लोकार्पण

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडीत “विश्रांती कट्टा” चे लोकार्पण*

*वैभववाडी प्रतिनिधी*

वैभववाडी शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या विश्रांती कट्ट्याचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून व वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरांमध्ये दत्त मंदिर नजीक नागरिकांच्या सोयीसाठी विश्रांती कट्टा उभारण्यात आला आहे. या विश्रांती कट्ट्याचा उपयोग प्रवासी, नागरिकांसाठी होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, दिगंबर पाटील, माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेविका संगीता चव्हाण, बंड्या मांजरेकर, मंगेश लोके, प्रकाश पाटील, अंकित सावंत व नगरसेवक, शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!