असलदे येथील वृद्धाश्रमात सिंधुदुर्ग ग्लोबल फाउंडेशन (रजि.)कडून अन्नदान

असलदे येथील वृद्धाश्रमात सिंधुदुर्ग ग्लोबल फाउंडेशन (रजि.)कडून अन्नदान

*कोंकण एक्सप्रेस*

*असलदे येथील वृद्धाश्रमात सिंधुदुर्ग ग्लोबल फाउंडेशन (रजि.)कडून अन्नदान*

*आर्थिक मदत करत सुश्राव्य भजनाने वातावरण केले भक्तिमय*

*कणकवली – प्रतिनिधी*

सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशन कणकवली (रजी.)च्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी प्रति वर्षाप्रमाणे ह्या ही वर्षी पितृ पक्षात आपल्या सहकाऱ्यांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्विविजा आश्रम येथे जात अन्नदान व आर्थिक मदत केली .तसेच सुप्रसिद्ध भजनी बुवा दुर्गेश मिठवाबकर यांनी आश्रम मधील आजी आजोबांसाठी सुश्राव्य भजन गायन केलं आणि सर्वांना मंत्र मुग्ध केलं.या आश्रम मध्ये साठ आजी आजोबा आहेत. पारंपारिक श्राद्ध कर्म घरी करून आपण एका दिवसाचे जेवण आश्रमात दान करावे असे आवाहन अभिनेत्री कांबळी यांनी केले .यावेळी फाऊंडेशन सदस्य मिलन पाटील,वैशाली राणे,रोहिणी तावडे,श्रद्धा पाटील,माधवी मिठबावकर, विशाखा तोंडोलकर, प्रतीक्षा बांदिवडेकर,बुवा – दुर्गेश मिठबावकर,तबला – मेघपर्ण एकावडे, पखवाज चिन्मय माधव,अनिल कांबळी,सागर पाटील उपस्थित होते.यावेळी आश्रम संचालक सिद्धेश शेट्ये व सर्व कर्मचारी यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!