*कोंकण एक्सप्रेस*
*आ. निलेश राणे यांनी मागणी केलेला येथील पाणी व टॉवर प्रश्न सोडवणार*
*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही*
*मालवण ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बुधवार 26 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग मालवण दौऱ्यात आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे व मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सेक्रेटरी काका आंगणे, बाबू आंगणे यांसह आंगणे कुटुंबीय तसेच आमदार रवींद्र फाटक, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, संजू परब, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, आंनद शिरवलकर, विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, बाळू नाटेकर, बंटी तुळसकर, अरविंद करलकर, दादा साईल, रत्नाकर जोशी, किसन मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विनायक राणे, आबा धडाम, हर्षद पारकर, दीपलक्ष्मी पडते, सरोज परब, नगरसेविका चांदणी कांबळी, नैना मांजरेकर, श्रुती वर्धम, उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, सोनाली पाटकर, अंजना सामंत, सिद्धी शिरसाठ, तुळसकर, नाटेकर, सुनील घाडीगावकर, सुशांत घाडीगावकर, मकरंद राणे, छोटू ठाकुर, प्रितम गावडे, दिलीप बिरमोळे, पंढरीनाथ माने, राजू बिडये, ऋषिकेश सामंत यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आंगणेवाडी येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खाली होत असलेल्या धरणातून पाणी लिफ्ट करून आंगणेवाडी येथे आणावे लागेल. त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून हा निधी राज्य बजेट माध्यमातून मिळावा. तसेच याठिकाणी जिओ मोबाईल टॉवर मंजूर व्हावा. यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. आपण यात लक्ष घालावे व निधी मंजूर व्हावा. याबाबत आमदार निलेश राणे यांनी लक्ष वेधले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमदार निलेश राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्धता केली जाईल असे सांगितले. तसेच आमदार निलेश राणे यांच्या कामाचे विशेष कौतुक करताना आंगणेवाडी तसेच मालवण कुडाळच्या विकासासाठी निलेश राणे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

