जागेत बदल पण “मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शहरातच होणार – आम.दीपक केसरकर

जागेत बदल पण “मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शहरातच होणार – आम.दीपक केसरकर

*कोंकण एक्सप्रेस*

*जागेत बदल पण “मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शहरातच होणार – आम.दीपक केसरकर*

*आता मंत्री नाही, त्यामुळे “एनर्जीने” काम करणार*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

न्यायालयीन आणि मालकीच्या तिढ्यात जागा अडकल्याने अनेक वर्षे प्रलबिंत राहीलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची जागा अखेर बदलण्याचा निर्णय माजी मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. परंतू जागा कुठची हे आत्ताच सांगत नाही.परंतू हॉस्पिटल शहरातच होणार आहे, असा दावा त्यांनी आज येथे केला.दरम्यान आपण आता काही मंत्री नाही.त्यामुळे मतदार संघातील कामे “एनर्जीने” करणार आहे. आपण एखादे काम हातात घेतले की ते पुर्ण करतोच ही आपल्या कामाची पध्दत आहे, असा दावा त्यांनी केला.

आज येथील पालिकेत त्यांनी सिंधुरत्न योजनेच्या कामाबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक तो सर्व्हे करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे. परंतू नेमकी जागा कुठची? असा प्रश्न त्यांना केला असता ते म्हणाले जागा नेमकी कुठची हे आत्ताच सांगत नाही. ती जाहीर केल्यास विरोधासाठी विरोध होवू शकतो. परंतू हॉस्पिटल हे शहरातच होणार आहे, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले तसेच आपण आता मंत्री नाही. त्यामुळे अधिकचा वेळ मतदार संघासाठी आणि लोकांना देणार आहे. आत्ता अनेक कामे मार्गी लावणार आहे आणि त्यासाठी एनर्जीने काम करणार आहे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!