जाणवली पुलानजीक आयशर टेंपोला मोठा अपघात; १६ जखमी

जाणवली पुलानजीक आयशर टेंपोला मोठा अपघात; १६ जखमी

 *कोकण Express*

*जाणवली पुलानजीक आयशर टेंपोला मोठा अपघात; १६ जखमी…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई – गोवा महामार्गावर कणकवलीतील जाणवली पुलानजीक मुंबई वरुन गोव्याला जाणारा ज्योती टूर्स आणि ट्रॅव्हेल चा आयशर टेंपोचा टायर फुटल्याने सुमारे ५ ते ८ फुट खाली कोसळला. या अपघातात सदर आयशर टेंपो मधील १६ जण जखमी झाले असून त्यातील एक गंभीर जखमी असल्याची माहीती मिळत आहे. तसेच जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना ६ वा. सुमारास घडली.
दरम्यान, महामार्गाचे काम चालू असून साईड पट्टीला संरक्षक बॅरिकेट नसल्याने सदर टेंपो सुमारे ५ ते ८ फुट खाली कोसळून अपघात झाला. यात टेंपो मधील कॅटरिंगच्या सामानाचे तसेच टेंपोचे मोठे नुकसान झाले. अपघताची समजता कणकवली पोलीस उपनिरीक्षक जगदीश बांगर, अनमोल राणे, हवालदार वैभव कोळी, राहुल तळसकर, वाहतूक पो. प्रकाश गवस यांनी धाव घेत घटना स्थळावरील वाहतूक कोंडी सुरळीत केली. यावेळी अपघात ग्रस्तांना पोलीसांसह मिलिंद कवडे,रामदास मांजरेकर, प्रसन्ना देसाई,अस्मिता तळेकर व आदींनी मदत कार्य केले. तर कोसळलेला टेंपो काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!