सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टरचा हलगर्जीपणा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टरचा हलगर्जीपणा

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टरचा हलगर्जीपणा*

*तिरोडा : प्रतिनिधि*

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शिरोडा, सावंतवाडी व इतर ठिकाणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय उपचारातील हलगर्जीपणामुळे रुग्णांचे हाल किंवा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वेळेवर उपचार न मिळणे, प्लेटलेट्स कमी असताना डिस्चार्ज देणे आणि डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांची बेशिस्त यामुळे नागरिकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे.अनेकदा २४ तास उलटूनही रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याच्या तक्रारी स्थानिकांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्या आहेत.
शिरोडा व सावंतवाडी तसेच इतर उपजिल्हा रुग्णालयात प्लेटलेट्स कमी असलेल्या रुग्णाला डिस्चार्ज दिल्याने व हलगर्जीपणा झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात नेले असता आपल्याकडे डॉक्टर नाही व अन्य सुविधा नसून आपण पेशंटला गोवा मेडिकल कॉलेज ( बाबोंळी ) किंवा अन्य ठिकाणी घेऊन जाणे योग्य ठरेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधांचा तुटवडा तसेच कारभारात सुधारणा करण्याची मागणी वारंवार होत आहे करण्यात आली असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यमंत्री, पालकमंत्री व आमदार यांच्या कडून कोणत्याही हालचाली व प्रयत्न करण्यात अपयशी ठरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!