*कोंकण Express*
*फोंडाघाट , लोरे विभागात भाजपने ‘गाव चलो अभियानस सुरुवात केली*
*गाव चलो अभियानाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांचे फोंडाघाट,लोरे विभागात भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डाजी यांच्या गाव चलो अभियान ला प्रतिसाद देत कणकवली तालुक्यात फोंडा- लोरे विभागात भाजपने ‘गाव चलो अभियान’ सुरू केले आहे. या अभियानात आमदार नितेश राणे साहेब यांनी स्वतः सहभाग घेत प्रवासी कार्यकर्ते यांचा उत्साह वाढवत खऱ्या अर्थाने घर चलो अभियान राबविण्यात मोलाचे योगदान दिले. भाजपाचे 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत देशभरात सर्व विधानसभा मतदार संघातील बूथ वर प्रवासी कार्यकर्ते प्रवास करणार आहेत.मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत घेऊन जाणे तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याचे काम करण्यासाठीच आमदार साहेब स्वतःच उतरत कार्यकर्ते यांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव करून दिली. सामान्य कार्यकर्ते सोबत खांद्याला खांदा लावून काम करणे ही राणेंची कार्यपद्धती या ‘गाव चलो अभियान’ च्या निमित्त पुन्हा एकदा अधोरेखित झाली . या अभियानांतर्गत बुथ सशक्तीकरण, मोदीजींच गेल्या दहा वर्षांतील वैभवशाली कारकीर्दीतील कामांची माहीती जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमदारांनी प्रवासी कार्यकर्तेवर सोपवली. यावेळेस प्रवासी कार्यकर्ते मनोज रावराणे, राजन चिके,विश्वनाथ जाधव, तसेच बबन हळदिवे, सुजाता हळदिवे, नरेश गुरव, सुमन गुरव, गजानन सावंत, अजय रावराणे, रुपेश चव्हाण, मिलींद लाड, पवन भालेकर यांसहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार साहेब यांनी भिंतींवर भाजपा ची कमळ निशाणी आणी घोषवाक्य *पुन्हा एकदा मोदी सरकार* हे दिवार लेखन स्वतः रंगवून या विधानसभेतील फोंडा लोरे विभागात आदर्शवत सुरवात केली तसेच लोरे बस स्टॉप वरिल मोदी सरकारच्या नऊ वर्षांतील कारकिर्दीचा उल्लेख असलेल्या भित्तिपत्रकाचे अवलोकन करीत या उपक्रमाचे कौतुक केले.

