शहर भाजपतर्फे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन

शहर भाजपतर्फे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन

*कोकण Express*

*शहर भाजपतर्फे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन*

*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉद्वारे बक्षीसे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपाच्यावतीने शुक्रवार २३ जूनला सकाळी ९ वाजता येथील लक्ष्मी

विष्णू हॉलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. रक्तदात्यांसाठी खास ‘लकी ड्रॉ द्वारे बक्षिसेही दिली जाणार आहेत. प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे. त्यासाठी माजी नगराध्यक्षा मेघा गांगण प्रायोजक आहेत. लकी ड्रॉमध्ये प्रथम विजेत्याला वॉशिंग मशीन, द्वितीय विजेत्याला ओव्हन, तृतीय विजेत्याला गॅस शेगडी भेट देण्यात येणार आहे. रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा कणकवली शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अण्णा कोदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!